| रेवदंडा | प्रतिनिधी |
नागाव, रेवदंडा व चौल शेकापक्षाच्या विभागीय चिटणीसपदी सचिन राऊळ व नागाव ग्रा.प. विभाग पुरोगामी युवक संघटनेच्या अध्यक्षपद अनिरूध्द राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चौल पाठारे क्षत्रीय समाज सभागृहात चौल विभाग शेकापक्ष आयोजीत जेष्ठ नागरीक सत्कार, गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच शेकापक्ष महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्याना सायकल वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख आम. जयंत पाटील यांच्या हस्ते सचिन राऊळ यांना शेकापक्ष नागाव,रेवदंडा व चौल विभागीय चिटणीसपदाचे तसेच नागाव ग्रा.प.विभाग पुरोगामी युवक संघटना अध्यक्षपदी अनिरूध्द राणे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नागाव ग्रामपंचायत सरपंच निखिल मयेकर यांची उपस्थिती त्याचे समवेत होती.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडूकासह विधानसभा निवडणूकीची शेकापक्षाची जोरदार मोर्चे बांधणी सुरू असल्यानेच तरूण तडफदार युवा नेतृत्वाकडे जबाबदारी सोपविताना सचिन राऊळ व अनिरूध्द राणे यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नागाव रहिवाशी असलेले सचिन राऊळ व अनिरूध्द राणे यांच्या नियुक्तीने नागाव ग्रा.प.विभाग पुरोगामी युवक संघटना अध्यक्षपदी अनिरूध्द राणे यांचे नागाव ग्रा.प. सरपंच निखिल मयेकर, ग्रा.प.सदस्य हर्षदा मयेकर व त्यांचे मित्रमंडळाने यांनी अभिनंदन केले. नवनिर्वाचीत रेवदंडा, नागाव,चौल शेकापक्ष विभागीय चिटणीस सचिन राऊळ हे नागाव पर्यटक सेवा संस्थेचे सदस्य तसेच हॉटेल व्यावसायीक संघटनेचे सदस्य म्हणून क्रियाशील आहेत.