न.प. कर्मचार्‍यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदन सादर

| आगरदांडा | प्रतिनिधी |

महाराष्ट्रातील नगरपंचायत, नगरपरिषद कामगार, कर्मचारी व संवर्ग कर्मचार्‍यांच्या अनेक वर्षांपासून विविध प्रलंबित मागण्यांकरिता 14 मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मुरुड तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती मुख्य संघटक- संतोष पवार, मुरुड-जंजिरा नगरपरिषद कर्मचारी संघटना अध्यक्ष राकेश पाटील, नरेंद्र नांदगावकर, नंदकिशोर आंबेतकर, सतेज निमकर, प्रकाश आरेकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

सन 2005 च्या नंतर नियुक्त सर्व कर्मचार्‍यांची अंशदायी पेन्शन रद्द करून त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, नगरपरिषद कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग त्वरित लागू करण्यात आलेला आहे. परंतु 7 व्या वेतनाची तिसरा, चौथा व पाचवा हप्त्याची रक्कम नगरपरिषदांना शासनाने दिलेली नाही ती मिळावी, ठेकेदाराकडे काम करीत असलेल्या कर्मचार्‍यांना हंगामी अथवा कंत्राटी कामगार यांना सेवेत करेपर्यंत किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देण्यात यावे तसेच उच्च न्यायालयाचे निर्देश समान काम समान वेतन देण्याबाबत निर्देश देऊन ही कार्यवाही होत नाही, निदान किमान वेतन सुध्दा देण्याची कारवाई नगरपरिषद करीत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान वेतन मिळावे म्हणून आदेशीत करावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

Exit mobile version