नागोठणे पोलिसांचा बाप्पांना भावपूर्ण निरोप

| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. नागोठण्यातील अंबा नदी किनारील विसर्जन घाटावर पोलिस निरीक्षक राजन जगताप, उपनिरीक्षक नारायण चव्हाण, सचिन निकम यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय, पत्रकार व नागरिक सहभागी झाले होते.

पोलिस ठाण्यालगत असलेल्या श्री दत् मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. नेहमी वर्दीत दिसणार्‍या मात्र विसर्जन मिरवणुकीसाठी खास वेशभूषा केलेल्या महिला पोलिस कर्मचारी, गणेश विसर्जनासाठी खास तयार केलेले टी शर्ट परिधान केलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी पारंपारिक बेंजोच्या तालावर ठेका धरत विसर्जन मिरवणुकीत मनसोक्तपणे नाचण्याचा आनंद लुटला. बाप्पांची ही मिरवणूक बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे अंबा नदीच्या विसर्जन घाटावर नेण्यात आली. याठिकाणी गणपती बाप्पांची सामूहिक आरती घेतल्यानंतर बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

Exit mobile version