नामदेव मरवडे यांना देवाज्ञा

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी या गावचे रहिवासी तथा पुजारी व सामाजिक कार्यकर्ते नामदेव नथू मरवडे यांना रविवारी (दि.19) अल्पशा आजाराने उपचारादरम्यान देवाज्ञा झाली. मृत्यूसमयी ते सुमारे 70 वर्षांचे होते.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह त्यांचे आप्तस्वकीय, मित्रपरिवार सगेसोयरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक भाऊ, तीन मुलगे, सुना, पुतणे, पुतण्या, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रियाविधी मंगळवार, दि.28 मे रोजी तर अंतिम धार्मिकविधी शुक्रवार, दि.31 मे रोजी त्यांच्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version