| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्व. नमिता नाईक यांचा स्मृतीदिन अलिबागमध्ये ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्व. नमिता नाईक यांनी विकासाला प्राधान्य देत शहरातील अनेक विषयांना पुर्ततेकडे नेले. संगीत, कला आणि नृत्य कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले. राजकीय, क्रीडा, शैक्षणिक, कला, संगीत तसेच सामाजिक क्षेत्रात आपली पक्कड कायम मजबूत ठेवून या क्षेत्रातील सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न नमिता नाईक यांनी केला. 18 जूलै 2015 मध्ये त्यांचे निधन झाले. 18 जूलै 2026 मध्ये त्यांचा अकरावा स्मृती दिन अलिबागमध्ये ठिकठिकाणी साजरा करण्यात आला.
अलिबागमधील नगरपरिषदेच्या कार्यालयात माजी नगराध्यक्षा स्व. नमिता नाईक यांच्या प्रतिमेस अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रदिप नाईक, जमाल सय्यद, समीर ठाकूर, ॲड. निवेदीता वाघमारे, मुख्याधिकारी सागर साळुंखे व कर्मचारी उपस्थित होते. अलिबागमधील शेतकरी भवन येथील सभागृहात शेकापच्या वतीने स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






