नारायण धामणसे यांचे निधन

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील शिरवली गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण पांडुरंग धामणसे यांचे गुरूवारी (दि.7) रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे दशक्रियाविधी 16 मार्च तर अंतिम धार्मिकविधी 19 मार्च रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version