। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुका शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची सन 2022 ते 2025 ची नवीन कार्यकारिणीसाठी स. म. वडके हायस्कूल चोंढी येथे (दि.17) रोजी सभा संपन्न झाली. सदर सभेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून सतीश पेडणेकर व जयंत कडवे यांनी कामकाज पाहिले. उपस्थित सर्व कर्मचारी यांच्या सहमतीने नवीन पदाधिकारांची निवड करण्यात आली. सु. ए. सो. माध्यमिक विद्यालय कुरूळ येथील नारायण पाटील यांची अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष पदासाठी दिलीप नाईक को. ए. सो. माध्यमिक विद्यालय शाहापूर, सचिवपदी अमर किणी, जा.र.ह. कन्या शाळा अलिबाग, सहसचिव, प्रकाश गिरी बा. ना. हायस्कूल आवास, खजिनदार, निलांबर थळे, लक्ष्मी नारायण विद्यामंदीर बहिरोळे यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी सर्व नवनिर्वाचित पदाधिका-यांचे गुलाब पुष्प देवून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.