नरेश कालेकर उपसरपंचपदी बिनविरोध

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील दहीवली तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या उपसरपंचपदावर नरेश कालेकर यांची बिनविरोध निवड झाली. आदेश धुळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. नरेश कालेकर यांनी भूमित्र भोईर या दोन्ही उमेदवार यांना प्रत्येकी सहा मते मिळाली. त्यामुळे पीठासीन अधिकारी सरपंच मेघा मिसाळ यांनी आपले मत नरेश कालेकर यांच्या पारड्यात टाकल्याने त्यांनी सात विरुद्ध सहा मतांनी विजय मिळविला.

दहिवली ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच आदेश धुळे त्यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी मालेगाव बिरदोले या प्रभागातून ग्रामपंचायत वर सदस्य म्हणून निवडून गेलेल्या भूमित्रा भोईर आणि नरेश कालेकर यांनी ग्रामपंचायत मधील थेट सरपंच मेघा मिसाळ यांच्याकडे अर्ज दाखल केले होते. निर्धारित वेळेत दोन्ही उमेदवार यांनी आपले अर्ज मागे घेतले नाहीत आणि त्यामुळे उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी सरपंच मिसाळ यांना ग्रामविकास अधिकारी सीमा राठोड यांनी सहकार्य केले.

Exit mobile version