वर्षा जांबेकरांना नारी पुरस्कार जाहीर

| सुकेळी | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील आमडोशी येथील बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना वेगवेगळ्या व्यवसाय व उद्योग धंद्यामध्ये सहकार्य तसेच महिलांना मार्गदर्शन करणाऱ्या वर्षा जांबेकर यांना नुकताच राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान नारीगौरव पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. मुंबई येथे (दि.8) मार्च रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या प्रेरणेने मुंबई-परळ येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. आमडोशी येथिल वर्षाताई जांबेकर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version