माणगावात रिक्षा संघटनेतर्फे नारळी पौर्णिमा साजरी

। माणगाव । वार्ताहर ।

माणगाव तालुका रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नारळी पौर्णिमा गुरुवार दि.11 ऑगस्ट रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष आस्वर यांच्याहस्ते नारळाची पूजा करण्यात आली.

संघटनेतर्फे गेली अनेकवर्षे हा सण उत्साहात साजरा केला जातो. गेली दोन वर्षे जगावर कोरोनाचे संकट होते त्यामुळे साधेपणात नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावर्षी शासनाने विविध सण, उत्सवांवरील निर्बंध उठविल्याने संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सण साजरा केला. यावेळी संघटनेतर्फे गाडी सजवून नारळाची वाजत, गाजत, नाचत मुंबई-गोवा महामार्गावरील बाजारपेठ ते काळनदी अशी उत्साहात मिरवणूक काढण्यात आले. सायंकाळी माणगाव काळ नदीच्या पात्रात नारळाचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष तसंजयआण्णा साबळे, रामनाथ डोईफोडे, शाम शिंदे, भाऊ पांडे, संतोष सावंत, जमाल पिलपिले,लियाकत रहाटविलकर, नरेश सावंत, हुसेन आकुस, पांडुरंग गुजर आदींसह सर्व रिक्षा चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version