| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. या पदावर पुन्हा एकदा भाजपच्या राहुल नार्वेकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरील निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. राहुल नार्वेकर हे रविवारी दुपारी 12च्या सुमारास विधानसभा अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करतील. यंदा महायुतीकडे प्रचंड संख्याबळ असल्याने राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरची निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे.