| बेळगाव | प्रतिनिधी |
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेते मंडळी उपस्थित राहू नये, यासाठी बाहेरून येणार्यांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच नऊ डिसेंबर रोजी शिनोळी व इतर सीमानाक्यांवर चोख बंदोबस्त ठेवून अटकाव केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी सांगितले की, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.