नाशिक | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात राणे यांचा जबाब नाशिक पोलिस येत्या 25 सप्टेंबर रोजी ऑनलाइन नोंदविणार आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे. यापूर्वी गणेशोत्सव असल्यामुळे 2 सप्टेंबर रोजी उपस्थित राहता येणार नसल्याचे पत्र राणे यांच्या वकिलांनी नाशिक पोलिसांना पाठविले होते. नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वकिलांशी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी, 25 सप्टेंबर रोजी राणे यांचा ऑनलाइन जबाब नोंदविला जाणार असल्याची माहिती दिली.