अनिल भोईर यांना राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार

| हमरापूर | प्रतिनिधी |

पेण तालुक्यांतील दूरशेत येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनिल भोईर यांना नुकताच भारत सन्मान राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

मैत्री सामाजिक संस्था, मुंबई मित्र, साई अर्पण फॉउंडेशन व सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान आयोजित भारत सन्मान राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार 2024 वितरण सोहळा शिर्डी येथे पार पडला. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून वनमाता राहिबाई पापरे, सुभाष गायकवाड, खा. भाऊसाहेब वाघचोरे, अभिजित राणे, ज्योती ठाकरे, सुरज भोईर, अभिनेत्री राजश्री गुरव, विजया कदम, संगीता गुरव, चारुशीला देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version