२६ मार्चला पोलादपूरमध्ये प्रेस क्लब सन्मान सोहोळा!
| रोहा | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा प्रेस क्लबचे पुरस्कार जाहिर करण्यात आले असून आचार्य अत्रे राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार मिड-डे मुंबईचे निवासी संपादक संजीव शिवडेकर यांना जाहिर करण्यात आला आहे. प्रेस क्लबच्या कार्यकारिणीची बैठक रोहा येथे संपन्न झाली त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार नागेश कुलकर्णी, विजय मोकल, सुनिल पाटील, भारत गोरेगावकर, देवयानी मोरे, मुकूंद रांजाणे, अजय गायकवाड, संतोष सुतार, श्याम लोखंडे यंदा प्रेस क्लब सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.

रायगड जिल्हा प्रेस क्बलच्या कार्यकारीणीची बैठक रोहा येथील हॉटेल प्राईड येथे नुकतीच घेण्यांत आली. विद्यमान अध्यक्ष भारत रांजणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कोकण विभाग सचिव अनिल भोळे, माजी जिल्हाध्यक्ष अभय आपटे, विजय मोकल, विद्यमान कार्याध्यक्ष मनोज खांबे, सचिव शशिकांत मोरे, उपाध्यक्ष मोहन जाधव, प्रशांत गोपाळे, दरवेश पालकर, नागेश कदम, आजी माजी पदाधिकारी तसचे नवीन नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारात जीवन गौरव पुरस्कार अलिबागचे ज्येष्ठ पत्रकार नागेश कुलकर्णी यांना, स्व.निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी स्मृती पत्रकार पुरस्कार पेण् येथील विजय मोकल आणि माथेरान मुकूंंद रांजाणे, स्व. प्रकाश काटदरे स्मृती निर्भीड पत्रकारिता भारत गोरेगावकर, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार डॉ. भरत वाटवाणी कर्जत, स्व.संतोष पवार स्मृती युवा पत्रकार पुरस्कार अजय गायकवाड कर्जत, सावित्रीबाई फुले महिला पत्रकारीता पुरस्कार सौ. देवयानी मोरे तळा, उत्कृष्ट व्हिडीओ जर्नालीस्ट सुनील पाटील पेण यांना जाहिर करण्यात आले आहेत. रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार पुरस्कार संतोष सुतार माणगाव आणि रोहा येथील शाम लोखंडे यांना जाहिर करण्यात आले आहेत.
26 मार्च रोजी पोलादपूर येथे होणाऱ्या रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या 17 व्या वर्धापनदिनी हे सर्व पुरस्कार मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यकारिणीच्या बैठकीत पोलादपूर येथे होणाऱ्या वर्धापन दिना बाबत प्राथमिक चर्चा पोलादपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रकाश कदम आणि रायगड जिल्हा प्रेस क्लबचे नवनिर्वाचित सचिव अनिल मोरे यांच्या समवेत करण्यात आली. तसेच इतर काही महत्वाच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.
या बैठकीमध्ये रायगड जिल्हा प्रेस क्लबचे नियोजित अध्यक्ष मनोज खांबे यांच्या सह सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सन्मान रोहा प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आला. बैठक संपल्यानंतर सौ. समिधा अष्टीवकर यांच्यावतीने सर्वांना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.