कड्यावरचा निसर्गराजा गणपती पर्यटकांचे आकर्षण

| नेरळ । वार्ताहर ।
माथेरानच्या डोंगरात एका मोठ्या दगडामध्ये नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची धुरा सांभाळणारे राजाराम खडे यांच्या मध्यातून कड्यावरचा गणपती साकारला गेला आहे. नेरळ -माथेरान मिनी ट्रेनच्या इंजिनाचे सारथ्य म्हणून अनेक वर्षे धुरा वाहणारे नेरळ येथील खड़े यांना माथेरानवरून नेरळकडे येतांना एक कडा नेहमी खुणावत असे साधारण 47-50 फूट उंचीच्या या कड्याला असलेला आकार यामुळे त्यांचे हात मिनीट्रेन घेऊन जातांना आणि येतांना प्रवासात त्यांचे हात आपोआप जोडले जात. त्यांनी 2005 मध्ये माथेरानच्या डोंगरात ज्यावेळी प्रचंड भुस्खनन झाले, यावेळी मिनीट्रेन बंद पडली होती. त्यामुळे सतत आपल्याकडे आकर्षित करणार्‍या त्या दगडाच्या कड्यावर खडे पोहचले. तेथे काळ्या पाषाणातील त्या दगडाला लोखंडी पत्र्याच्या साहाय्याने गणपतीच्या तोंडाचा आकार देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी खडी आणि सिमेंट यांच्या सहाय्याने हात तयार केले. त्या चार हातात गणपती बाप्पाची चार आयुधे देण्यात आली. त्यामुळे बाप्पाचा आकार आल्याचे लक्षात येताच खडे यांनी आपले सहकारी विश्‍वनाथ भोसले आणि राजीव शिंदे यांच्या मदतीने गवंडी काम करून निसर्ग राजा गणपती म्हणजे कड्यावरचा गणपती घडविला. हि सर्व कामे करतांना खडे यांनी लोखंड, सिमेंट, वाळू, खडी आदी वस्तूंची नेरळ माथेरान घाट रस्त्याने तसेच मिनीट्रेन सुरु झाल्यानंतर मिनीट्रेन मधून नेवून पूर्ण केले.

नेरळ – माथेरान घाटरस्त्यात आपली दुचाकीवर या वस्तू नेत्यांना पुढे चार किलिमीटर अंतर पायी मिनीट्रेनच्या ट्रॅक ने नेण्याचा प्रयत्न केला. 47 मीटरच्या दगडी कड्याला गणेशाच्या भक्तीमुळे आकार देण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर त्यांनी पुढे गणेशापुढे मोदक असावा म्हणून,तब्बल साडेपाच फूट उंचीचा आणि एका व्यक्तीच्या कवेत येणार नाही एवढा मोठा मोदक सिंमेंटच्या सहाय्याने तयार करण्यात आला. तर त्या निसर्गराजा गणपतीच्या बाजूला एक कमी जाणवत असल्याचे त्या ठिकाणी भेट देणारे आवर्जून सांगायचे. कारण अगदी लहान आकाराचा असलेला उंदीरमामा म्हणजे मूषकराज हा देखील भलामोठा असावा या हेतूने खडे यांनी तब्बल सात फूट उंचीचा बनविला. एखाद्या व्यक्तीच्या उंचीपेक्षा मोठ्या आकाराचा उंदीरमामा असावा हि गोष्ट निसर्गराजा गणपती येथे शक्य झाली आहे. त्या कड्यावरचा गणपतीला रंगरंगोटी करण्यासाठी देखील अडचण निर्माण होऊ नये म्हणून लोखंडी शिड्या बनविण्यात आला आहेत. नेरळ ममदापुर येथील बाळू कारले यांनी त्या परिसराला आणि कितीही दूरवरून पाहिले तरी आकर्षक दिसेल असे रंगकाम पूर्ण करून केले आहे.त्यामुळे मिनीट्रेन मधून प्रवास करणारा प्रत्येक पर्यटक त्या गणपती कडे पाहून दगडात कोरलेल्या गणेशाच्या मूर्तीचे कौतुक करावीत असतात.

Exit mobile version