चाईल्ड केअर संस्थेतर्फे नवदुर्गांचा सन्मान

| उरण | वार्ताहर |

चाईल्ड केअर सामाजिक संस्थेतर्फे वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात. त्यातील नवदुर्गा सन्मान या उपक्रमच्या माध्यमातून विविध श्रेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना देण्यात गौरवण्यात आले.

नवदुर्गा सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे कारण हा सन्मान नारी शक्तीचा सन्मान आहे. या सन्मानाने उरणच्या संपूर्ण नारी शक्तीचा सन्मान झाला आहे. आणि यामुळे उरण तालुक्यातील 9 महिला नव्हे तर हजारो स्त्रिया आपआपल्या क्षेत्रात उल्ल्‌‍खनीय कार्य करतील, असे विश्वास चाईल्ड केअर सामाजिक संस्थाचे संस्थापक-अध्यक्ष विकास कडू यांनी व्यक्त केला. कनिष्का नाईक (महिला पोलीस), रेखा ठाकूर (अभिनेत्री ), शारदा खारपाटील (आदर्श शिक्षिका), तुप्ती भोईर (टीव्ही वृत्त निवेदिका), हेमाली पाटील (लेखिका/कवी), वृषाली पाटील (गायिका), संगीता ढेरे (समाजसेविका) सीमा भोईर (पत्रकारिता), डॉ. प्रियांका म्हात्रे (वैद्यकीय क्षेत्र) या महिलांना नवदुर्गा सन्मान पुरस्कारने गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाला सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर आणि कुणाल पाटील (सरपंच पागोटे), जयप्रकाश पाटील (अध्यक्ष नवघर) यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विकास कडू यांनी केले, तर आभार प्रदर्शन विक्रांत कडू यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार मिलिंद खारपाटील, विठ्ठल ममताबादे, जेष्ठ गायक गणेश बंडा, कल्पेश थाळी, देविदास थळी, मेघनाथ थाळी, महेंद्र घरत, तुषार ठाकूर (कार्याध्यक्ष), रिया कडू (सह सचिव ), ह्रितिक पाटील (उपाध्यक्ष), उद्धव कोळी (सह खजिनदार), विवेक कडू (सदस्य), रोशन धुमाळ (सदस्य) यासह अन्य पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version