रायगडसह नवी मुंबई, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा

पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मागील काही दिवसांपासून अधूनमधून बरसणार्‍या पावसाने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात गुरुवारी दमदार हजेरी लावली. आता मुंबईसह अन्य जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील 2 दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ठाणे शहरात साचले पाणी
ठाणे शहरातील गटारे व नाल्यांची सफाई व्यवस्थित न झाल्याने पाणी तुंबले होते. वर्तकनगरात घराची शेड कोसळली आहे. यात कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. मीरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावली.

रायगडमध्ये पावसाचे धुमशान
अलिबाग – रायगड जिल्ह्यात गुरुवारी अनेक ठिकाणी जास्त पाऊस पडला. रोहा तालुक्यातील कवाळटे केळघर येथे दरड कोसळली. त्यामुळे रोहा आणि मुरुड तालुक्यातील दळणवळणचा मार्ग बंद झाला. अलिबाग येथे सर्वाधिक 104 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.

Exit mobile version