राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली शंका
। अकोला । वृत्तसंस्था ।
मराठा आरक्षणासह राज्याशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक शंका देखील उपस्थित केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे व पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्या अनुषंगानं मिटकरी यांनी एक ट्वीट केलं आहे. ममहाविकास आघाडीचे नेते पंतप्रधान मोदी यांची भेट घेत असल्यानं चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल.
देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजून घेतील, असा आम्हाला विश्वास आहे. मात्र, कमालीची अस्वस्थ झालेली पाटील-फडणवीस ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारीपाठाचा मशकुनीफ डाव टाकल्याशिवाय राहणार नाही,फ अशी भीती मिटकरी यांनी व्यक्त केली आहे.