| पनवेल | प्रतिनिधी |
अज्ञात सायबर चोरट्यांनी तळोजा येथे राहणाऱ्या तरुणाच्या मोबाईलवर एपीके फाईल पाठवून त्याद्वारे त्याचा मोबाईल हॅक करून त्याच्या खात्यातून तब्बल पावणेआठ लाख रुपये परस्पर काढून घेतल्याचे उघडकीस आले. उरण पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
रणधीर सिंह (36) हा तळोजा फेज 2 मध्ये राहतो. तो बेलापूर येथील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. सायबर चोरट्यांनी रणधीर सिंह याच्या मोबाईलवर वाहन चलान बाकी असल्याबाबतचा मेसेज आला. त्यानंतर त्यांना व्हॉट्सॲपद्वारे एक एपीके फाईल पाठवण्यात आली. रणधीर याच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड झाली. सुरुवातीला रणधीर याने त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु काही वेळातच त्याला आधार ओटीपी, तसेच बँक खात्याशी संबंधित संदेश येऊ लागले. त्यानंतर त्याच्या खात्यातून सलग चार ट्राझक्शनद्वारे तब्बल हा 7 लाख 85 हजारांची रक्कम परस्पर काढून घेण्यात आली. या त्यानंतर रणधीर सिंह याने तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली. प्राथमिक तपासात सायबर चोरट्यांनी कॉल फॉरवर्डिंग आणि रिमोट ॲक्सेसद्वारे त्याच्या मोबाईलवर ताबा मिळवून त्याच्या खात्यातील पावणे आठ लाखांची रक्कम काढून घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर रणधीर सिंह याने उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.







