फलक काढण्याची पनवेलकरांची मागणी
| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेलच्या उड्डाणपुलाला लागूनच पनवेल महानगरपालिकेने लावलेला स्क्रीन बोर्ड (फलक) हा असलेला अपघाताचा फलक होऊ शकतो, त्यामुळे या ठिकाणी स्क्रीन बोर्ड लावू नये, अशी मागणी पनवेलकर नागरिकांकडून होत आहे.
नवीन पनवेलहून पनवेलकडे येणाऱ्या उड्डाणपूलावरुन (उतारावर) येत असताना डाव्या बाजूकडे उड्डाणपुलाला लागूनच असलेल्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेने जाहिरातीचा जो स्क्रीन बोर्ड लावला आहे, तो बोर्ड अपघाताचा बोर्ड होऊ शकतो? या स्क्रीन बोर्डावर अजूनही जाहिराती सुरू केल्या नसल्यातरी उड्डाणपुलावरून पनवेलकडे येताना वाहन चालकांचे लक्ष या स्क्रीन बोर्डकडे जाणार, स्क्रीन बोर्डवरील जाहिराती आणि लख्ख प्रकाश वाहन चालकांचे लक्ष वेधणार, उड्डाणपूल आणि स्क्रीन बोर्ड यामध्ये कमी अंतर असल्याने, त्यात उतार, अशा वेळेस अपघात होण्याची शक्यता आहे. पनवेल महानगरात खड्ड्यांचे साम्राज्य असून, त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही मात्र पनवेल महानगरपालिकेने जिथे जागा मिळेल, तिथे स्क्रीन बोर्ड लावण्याचा धडका लावला आहे. परंतु, हा स्क्रीन फलक लावू नये, कोणतीही अपघाताची दुर्घटना होऊ नये म्हणून, हा स्क्रीन बोर्ड लावू नये, अशी नागरिकांची मागणी आहे.







