। पालघर । प्रतिनिधी ।
वसई पूर्वेतील एमआयडीसी परिसरात स्टीलची आणि इतर धातूंची भांडी बनविणारे असंख्य कारखाने आहेत. या कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूर आणि धुळीमुळे त्या कंपन्यांमध्ये काम करणार्या कामगारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. यामुळे त्यांना गंभीर आजार होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या कर्मचार्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित कंपन्यांची आहे. परंतु, या कामगारांचा वाली कोणीही नाही असे चित्र सध्या दिसून येत आहे.
भारतीय कंपनी कायदा 1948 नुसार कंपनीत काम करणार्या कामगारांच्या आरोग्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी संबंधित कंपन्यांची असते. परंतु, वसई एमआयडीसीमध्ये स्टीलची भांडी बनविणार्या कंपन्यांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणालाही पर्वा नाही. कामगार प्रचंड मेहनत करून मालकांना नफा कमवून देत असतात. परंतु, त्याच कंपन्या कामगारांच्या आरोग्याची हेडसांड करतात आणि कामगारांच्या सुरक्षेचे कोणतेही उपाय करतांना मालक दिसून येत नाहीत. तसेच, बहुतेक बफिंग कंपन्यांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांना मास्क, बूट आणि संपूर्ण शरीर झाकले जाईल असा गणवेश कंपन्या पुरवत नाहीत.
आम्ही सर्व विभागात डास प्रतिबंधक फवारणी करु व अस्वच्छताही दूर करू. जर काही भागात फवारणी झाली नसेल तर आम्ही लवकरच त्या परिसरात फवारणी करू व गटारी साफ करू व कामगारांचे आरोग्य जपू.
– सुखदेव दरवेशी, सहाय्यक आयुक्त