पेणची नेहा पाटील ठरली महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी

I पेण I प्रतिनिधि I

पेण तालुक्यातील गडब गावची सुकन्या नेहा पाटील ही कलर्स मराठी वाहिनीवरील ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात महाअंतिम फेरीत अंतिम विजेती झाली असून महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी ठरली आहे.

नेहा पाटीलने पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्याचे नाव मोठे केल्याने ठिकठिकाणी तिचे स्वागत होत असून पेण तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि विक्रम मिनिडोअर चालक मालक संघटना जिल्हा अध्यक्ष यांनी पेणवासियांकडून तिचे स्वागत करण्यात आले आहे.

येत्या ८ तारखेला रविवारी पेणमध्ये भव्य मिरवणूक काढून पेण महात्मा गांधी वाचनालय येथे लावणी सम्राज्ञी नेहा पाटील हीचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. तरी नेहा पाटील हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्व नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version