| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेचे नेरळ स्थानकात फलाट एक वर उभारण्यात आलेले उदवाहन कधी सुरु होणार असा प्रश्न विचारात आहेत. नेरळ जंक्शन स्थानकाचा कायापालट करण्याचे कार्य सुरु असून, नेरळ स्थानकात फलाट एकवर उभारण्यात येत असलेली उदवाहन अनेक महिन्यापासून कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे नेरळ स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी यांच्याकडून उदवाहन सुरु केले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
नेरळ जंक्शन स्थानकात फलाट दोनवर उदवाहन असून, त्या लिफ्टचा फायदा प्रवासी घेत असतात. मात्र, फलाट एक वर अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे नेरळ स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी यांच्याकडून फलाट एकवर उदवाहन यंत्रणा बसवण्यात यावी अशी मागणी केली जात होती. माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी मुंबई येथून लोकलच्या माध्यमातून येणारे प्रवासी हे फलाट एकवर उतरत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी उदवाहन असावे अशी मागणी प्रवासी वर्ग करीत होता. स्थानकाच्या मध्यभागी गेल्या वर्षांपासून उदवाहन उभारण्याचे काम सुरु होते, मात्र वर्षे झाले तरी उदवाहन कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत असून, नेरळ स्थानकात अनेक सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात असताना उदवाहन सुरु होत नसल्याने ते काम वेगाने व्हावे अशी मागणी नेरळ रेल्वे प्रवासी संघटना करीत आहे. गेल्या वर्षांपासून उदवाहन उभारण्याचे काम सुरु असून ते उदवाहन सुरु करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
नेरळ स्थानक उदवाहन विना
