नेदरलँड क्रिकेट टीम जाहीर

दोन अनुभवी खेळाडूंचं कमबॅक

| मुंबई | प्रतिनिधी |

आयसीसीविश्वचषक 2023 चे काउंटडाऊन सुरु झालं आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेला मोजून महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. एकूण 10 संघांमध्ये वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. त्याआधी वर्ल्ड कपसाठी एकएक टीमची घोषणा केली जात आहे. बीसीसीआयने 5 सप्टेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियानही क्रिकेट संघ जाहीर केला. आता 7 सप्टेंबर रोजी नेदरलँड क्रिकेट टीमची घोषणा करण्यात आली आहे.

विश्व चषक 2023 साठी नेदरलँड क्रिकेट टीम मध्ये स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट या खेळाडूंचा समावेश असणार आहे.

Exit mobile version