| पनवेल | वार्ताहर |
खारघर वसाहतीमध्ये प्रवेश करण्यासाठी दुसरे प्रवेशद्वार गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर वाहनांसाठी खुले करण्यात आले. यासाठी सिडको मंडळाने सुमारे एक कोटी रुपये खर्च केला असून, यामुळे शीव-पनवेल महामार्गावरुन थेट कोपरा पुलावरून खारघर वसाहतीमध्ये वाहनांना शिरता येईल. यापूर्वीचा या ठिकाणचा पूल हा हलक्या वाहनांसाठी होता. येथे नवीन रुंद पूल बांधण्याची मागणी वाहनाचालकांकडून केली जात होती.
खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी तात्पुरत्या स्वरुपात हा पूल कोपरा गावाजवळ बांधला होता. मात्र, कायमस्वरूपी पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांकडून केल्यानंतर सिडको मंडळाने 22 मीटर रुंदीचा आणि साडेसात मीटर लांबीचा पूल खाडी पात्रावर उभारला. या पुलावरून अवजड वाहतूक टाळण्यासाठी हाईटगेट लावणार आहे. यामुळे विनाअडथळा सेक्टर 12 ते सेक्टर 35 पर्यंत जाणार्या या मार्गावरील प्रवास वेगाने होणार आहे.