माथेरानमध्ये नवीन ई-रिक्षा दाखल

श्रमिकांच्या हाती स्टिअरिंग

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान या थंड हवेच्या आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या शहरात पर्यावरण पूरक ई-रिक्षा चालविल्या जात आहेत. माथेरानमधील हातरिक्षा चालक यांच्यासाठी पर्यावरण पूरक ई-रिक्षा चालविण्यात याव्यात, अशी मागणी सर्वीच्या न्यायालयाने मान्य केली आहे. त्यानुसार श्रमिकांच्या हाती या पर्यावरण पूरक ई रिक्षा यांचे स्टिअरिंग दिले जाणार असून उद्या सोमवारी हा सोहळा माथेरानमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

माथेरान शहरात सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने पर्यावरण पूरक ई-रिक्षा चालविल्या जात आहेत. सध्या ई-रिक्षा यांचे दुसरा पायलट प्रकल्प राबविला जात आहे. माथेरान या ब्रिटिशांनी वसविलेल्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यावरण राखण्यासाठी कोणत्याही वाहनांना परवानगी नाही. प्रदूषण रोखण्यासाठी ब्रिटिशांनी लागू केलेला नियम आजही कायम आहेत. माथेरानमधील विविध शाळेचे विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिक तसेच, गरोदर महिला यांच्या सोयीसाठी पर्यावरण पूरक ई-रिक्षा असाव्यात म्हणून सर्वोच्य न्यायालयाने 2022 मध्ये ई-रिक्षा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. माथेरानमधील हातरिक्षा चालक यांच्याकडून अमानवी पद्धतीने व्यक्तीला ओढून नेण्याची प्रथा दूर करावी यासाठी हातरिक्षा संघटना यांनी एक तप हा लढा दिला होता. श्रमिक हातरिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे हा लढा लढत होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशाने माथेरानमध्ये पर्यावरण पूरक ई-रिक्षा सुरू झाल्या पण त्यांचे स्टिअरिंग हे स्थानिक श्रमिकांच्या जाती नव्हते. त्यामुळे पुन्हा सर्वोच्य न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करावा लागला होता.

पहिल्या टप्प्यात ई-रिक्षा चालविण्याची परवानगी दिली होती आणि त्यानंतर त्यासाठी निविदा काढली होती. माथेरान नगरपरिषदकडून 20 ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी निविदा काढली आहे. त्यासाठी माथेरानमधील 24 हातरिक्षा चालक यांनी निविदा भरल्या आहेत. सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव रायगड जिल्हाधिकारी असून त्यांच्याकडून आलेल्या आदेशाने 27 मे रोजी सोडत घेण्यात आली. त्यानंतर रायगड जिल्हाधिकारी यांचे आदेशाने पर्यावरण पूरक ई-रिक्षा माथेरानमधील सोडतमध्ये नाव निघालेल्या 20 हातरिक्षा चालक यांनी रिक्षा खरेदी केल्या आहेत. साधारण साडेतीन लाख रुपये किमतीच्या प्रत्येकी एक अशा 20 ई-रिक्षा पनवेल येथून माथेरान येथे पोहचले आहेत. या रिक्षा खरेदी करण्यासाठी हातरिक्षा चालक यांना ‘रंग दे’ या स्वयंसेवी संघटनेने अर्थ सहाय्य केले आहे. उद्या या ई-रिक्षा यांचे माथेरान पालिकेच्या पायलट प्रकल्पमध्ये समावेश होणार आहे. माथेरान पालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या पायलट प्रकल्पमध्ये आता नवीन 20 ई-रिक्षा सहभागी होत असल्याने पर्यटक आणि स्थानिकांच्या सोयीसाठी आता 27 ई-रिक्षा दिमतीला असणार आहेत. त्यामुळे ई-रिक्षा कमी पडणार नाहीत अशी स्थिती नवीन ई-रिक्षा आल्याने निर्माण होणार आहे. उद्या सोमवारी या ई-रिक्षा यांचे लोकार्पण होणार असून स्थानिक आमदार महेंद्र थोरवे उपस्थित राहणार असल्याची माहिती श्रमिक हातरिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सुतार सचिव सुनील शिंदे यांनी दिली आहे.

40 हातरिक्षा चालक यांच्याकडे परवाने
या रिक्षा माथेरानमध्ये 5 डिसेंबर 2022 मध्ये ई-रिक्षा सुरू झाल्यावर बहुसंख्य हातरिक्षा चालक यांनी रिक्षा चालविण्याचे परवाने घेण्यासाठी प्रशिक्षण घेतले आहेत त्यांना मिळणार आहेत. आजच्या घडीला माथेरानमधील 40 हातरिक्षा चालक यांच्याकडे परवाने आहेत. तर ई-रिक्षा चालविण्यासाठी आवश्यक असलेले बॅच 36 हातरिक्षा चालक यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्या वाहन परवाना असलेल्या 36 पैकी 20 हातरिक्षा चालक यांना रिक्षा खरेदी करण्याची परवानगी श्रमिक रिक्षा चालक संघटना यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. माथेरानमध्ये ई-रिक्षा आणण्यासाठी ज्यांनी न्यायालयीन लढाई श्रमिक हातरिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी लढली होती.
Exit mobile version