न्यू इंग्लिश म्हसळाचे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

| म्हसळा | वार्ताहर |

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसळा या विद्यालयातील विद्यार्थिनी वैष्णवी मेंदाडकर व नचिकेत गाणेकर या दोन विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत यश संपादन करून शिष्यवृत्तीसाठी जिल्हा यादीमध्ये स्थान प्राप्त केले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी बारा हजार रुपयांप्रमाणे पुढील चार वर्षांपर्यंत एकूण 48,000 रू. शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. विद्यालयामार्फत या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड, प्रा. प्रकाश हाके, स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन समीर बनकर, अजय करंबे, सेजल काते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी शुभेच्छा देताना गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांनी सांगितले की, तालुक्यातून सर्व शिक्षकांनी अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आमच्या माध्यमातून हवे ते मार्गदर्शन करण्याचे आश्‍वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

Exit mobile version