। उरण । वार्ताहर ।
म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनच्या उरण नगरपरीषद उरण युनिटचे अध्यक्ष रमेश कांबळे हे तब्बल 15 वर्ष अध्यक्ष होते. ते 31 मे रोजी निवृत्त झाले. या अनुषंगाने गुरुवारी (दि.27) संघटनेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पुढील कार्यकाळात संघटनेच्या अध्यक्षपदाची धूरा हरेश जाधव यांची निवड करून सर्वानुमते सोपविण्यात आली. उरण नगरपरीषदेच्या युनिटची नवीन कार्यकारिणी संघटनेचे सरचिटणीस अनिल जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली. अध्यक्ष हरेश जाधव, कार्याध्यक्ष मधूकर भोईर, सचिव नरेंद्र उभारे, खजिनदार माधव सिद्धेश्वरे, उपाध्यक्ष राजेश सोलंकी, उपाध्यक्ष महेंद्र साळवी, उपाध्यक्ष धनेश कासारे यांची नेमणूक उरण नगरपरीषद कर्मचार्यांनी सर्वानुमते केली. म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सरचिटणीस अनिल जाधव यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष हरेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
उरण युनिटची नवीन कार्यकारिणी जाहीर
