। उरण । वार्ताहर ।
उरण नगर पालिकेतील म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियन या कामगार संघटनेच्यावतीने तालुक्यातील पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते कर्तव्य दक्ष पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव, उरण युनिटचे अध्यक्ष रमेश कांबळे, कार्याध्यक्ष मधुकर भोईर, सचिव नरेंद्र उभारे, हरेश जाधव, जेष्ठ पत्रकार प्रदिप पाटील, जेष्ठ पत्रकार प्रविण पुरो आदी सह इतर मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. दरम्यान, नगर पालिकेतील कंत्राटी पद्धतीने काम करणार्या कामगारांच्या समस्यांसंदर्भात उत्कृष्ट कामगिरी करणार्या अॅड. सुरेश ठाकूर, अनिल जाधव, संतोष पवार, तसेच जेष्ठ पत्रकार प्रदिप पाटील, प्रविण पुरो, पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, मिलिंद खार पाटील यांच्यासह इतर तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.