| पुणे | प्रतिनिधी |
स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. मात्र, तरीही बलात्कासारखा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिम्मत झाली. या प्रकाराने शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी बुधवारी (दि.26) दुपारच्या सुमारास बस स्थानकातील कार्यालय फोडले.
स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रेय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. पीडित २६26 वर्षाची तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली. त्यावेळी तिच्याशी गोड बोलून एसटीमध्येच आरोपीने बलात्कार केला. वसंत मोरे यांनी बुधवारी दुपारच्या वेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह एसटी स्थानक गाठलं. यावेळी स्वारगेट स्थानकात ठाकरेंच्या सेनेकडून तोडफोड करण्यात आली. वसंत मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून झाल्यावर थेट आगार प्रमुखांचे कार्यालय गाठले. त्यांनी आगार प्रमुखांकडून घटनेची माहिती घेतली तसेच तुम्हाला हा प्रकार कधी माहिती पडला, असे विचारले. आगार प्रमुखांकडून व्यवस्थित उत्तरे न मिळाल्याने त्यांनी तेथील कार्यालयाच्या काचा फोडल्या.