सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई | प्रतिनिधी |
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर देखील तो चर्चेत असतो. निवृत्तीनंतर सचिन अनेक उपक्रम किंवा वैयक्तिक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो. याआधी ट्रेनिंग, खास काही पदार्थ तयार करतानाचे व्हिडिओ सचिनने शेअर केले होते. आता मात्र सचिनने एक खास फोटो शेअर केला आहे. ज्याचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे.
सचिन तेंडुलकरच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. हा नवा पाहुणा अन्य कोणी नसून सचिनचा नवा श्वान आहे. सचिन त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. त्याचा फोटो शेअर करताना सचिन म्हणतो, स्पाइक माझा नवा पार्टनर आहे. सोशल मीडियावर त्याचा पहिला फोटो शेअर करत आहे.
