पेण परिवहन कार्यालयातर्फे नवीन मालिका

। हमरापूर । प्रतिनिधी ।

पेण येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 06 दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरुन हवे असतील त्यांनी शुक्रवार (दि.05) रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 02.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात डीडी, पत्याचा पुरवा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी सायंकाळी 4.00 वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन सोमवार (दि.08) रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत संबंधित रकमेचा डीडी कार्यालयात जमा करून दुपारी 4.00 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या दालनात लिलाव करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version