साक्षीदाराचे न्यायालयात अनेक गौप्य स्फोट
मुंबई | प्रतिनिधी |
मालेगाव स्फोट प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. या प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने आपला छळ केल्याचे सांगत योगी आदित्यनाथ यांच्यासह आरएसएसमधील अन्य चार जणांची नावे सांगण्यास भाग पाडले होते, असा गोप्य स्फोट या प्रकरणातील साक्षीदाराने मंगळवारी विशेष एएनआय न्यायालयात केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 220 जणांची साक्ष नोंदविण्यात आली असून आतापर्यंत 15 साक्षीदारांनी त्यांची साक्ष बदलली आहे.
मशिदीजवळ मोटारसायकलमध्ये ठेवलेल्या स्फोटकांमुळे हा स्फोट झाल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा प्राथमिक तपास एटीएसने केला होता. मात्र तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. दरम्यान, आता एनआयएच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यासह लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी यांची नावे आरोपी म्हणून आहेत