मुरुड समुद्रकिनार्यांवर तुफान गर्दी
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
सरत्या वर्षाला निरोप देत नविन नववर्षाच्या स्वागतासाठी मुरुड पर्यटन क्षेत्रावर मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी केली आहे. नविन वर्षे सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण विविध ठिकाणी फिरायला जात असतात. याच पार्श्वभूमीवर मुरुडला पर्यटकांनी चांगली पसंती दिली आसुन पर्यटकांनी समुद्रकिनारे बहरले आहेत. नविन वर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारावरील हॉटेल, लॉजिंग, रेस्टॉरंट विद्युत रोषणाईने सजले आहेत. तसेच, पर्यटकांनी घोडागाडी, ऊंटस्वारी, बाईकस्वारी, सायकलस्वारी करणे पसंत केले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी वाढत असल्यामुळे वाहतुक व्यवस्था ही विस्कळीत होत आहे.