नवनिर्वाचित सरपंच,सदस्यांचा सन्मान

| पाताळगंगा | वार्ताहर |

आशाई मसालेच्या तिसरा वर्धापन दिनानिमित्त ग्रूप ग्राम पंचायत माजगांवमधून निवडून आलेले सरपंच,उपसरपंच,सदस्य तसेच पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन एकनाथ पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वर्धापन दिनांनिमित्त गृप ग्राम पंचायत माजगांव नवनिर्वाचित सरपंच दिपाली पाटील, उपसरपंच राजेश पाटील, सदस्या अर्पणा शिंदे, वंदना महाब्दि, पुनम जाधव, प्रांजळ जाधव, वैशाली महाब्दि, सरिता वाघे, शशिकांत पाटील, मधुकर गायकवाड, रविंद्र ढाकसळ,तसेच काशिनाथ जाधव यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती खालापूर सभापती जयवंत पाटील, अविनाश कांबळे, नरेश पाटील, निखिल पाटील, भारती लोते, गजानन पाडगे, राजेश मेहत्तर, विशाल म्हामूणकर, मंगेश पाटील, देवराम कांबळे, रमेश जाधव, नितिनि महाब्दि, अमित पाटील, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version