निलेश मसणे एमपीएससी परीक्षेत यशस्वी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील आंबोट या गावातीलनिलेश मसणे याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेची तयारी केली. त्याने आंबोट गावातील रायगड जिल्हा परिषदेतील शाळेत झाले तर चौथी नंतर बारावीपर्यंत गौळवाडी येथील माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयात कला शाखेत पदवी मिळविली. 2020 मध्ये कला शाखेची पदवी घेतल्यानंतर एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्धार केला आणि त्याची तयारी सुरु केली. राज्य लोकसेवा आयोग 2023 परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात निलेशला एमपीएससी परीक्षेत यशस्वी होऊन पोलीस अधिकारी होण्याचा मान मिळविला.

Exit mobile version