दिशा सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेत निलिमा सहाणे ठरल्या सौंदर्यसम्राज्ञी

दिशा महिला मंचाचा पुढाकार
। पनवेल । वार्ताहर ।

दिशा कल्चरल इव्हेंट्स प्रस्तुत दिशा महिला मंच आयोजित दिशा सौंदर्यसम्राज्ञी या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कामोठे येथे आगरी हॉल येथे करण्यात आले होते. चूल आणि मुलं बाजूला सारून आपल्या अस्तित्वाला पंख मिळावे तसेच आपले गुण व कौशल्य दाखवण्यासाठी प्रत्येक ‘ती’च्यामध्ये एक सुंदरता दडलेली असते, तिला सिद्ध करण्यासाठी या सौंदर्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 29 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या निलिमा सहाणे फर्स्ट रनर अप ठरल्या पूनम शेलार व सेकंड रनर अप ठरल्या शमिका जाधव. तसेच दहा महिलांना टायटल विनरने ही सन्मानित करण्यात आले. धर्मेश कडू, श्रुणाल जाधव व नंदिता परिडा यांनी कार्यक्रमाचे परीक्षण केले. स्पर्धाकांनी ही संधी समजून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत घेतली होती.
मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. स्नेहलता खडबडे, शिवश्री लावंड, डॉ. रुक्मिणी अर्जुन, रेणुका डिसुजा, मीना खाकी पावडरचे सीईओ मंदार पोतदार, दिलीप पाटील, शाम कुलथे, जयकुमार डिगोले, रांगोत्सव सेलेब्रेशन, श्रीजिता बॅनर्जी, पल्लवी गायकवाड यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. ज्ञानेश्‍वर बनगर, विद्या घारे या कार्यक्रमास पाहुणे म्हणून उपस्थित होते. मिना खाकी कंपनी कडून उपस्थित मान्यवर व विजेत्यांना गिफ्ट ही देण्यात आले. तृतीय पंथीयांविषयीचा समाजाचा असणारा दृष्टिकोन दूर व्हावा व माणूस म्हणून त्यांच्याबरोबर माणसासम वागूयात असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती यांनी, तर आभार प्रदर्शन खुशी सावर्डेकर यांनी केले. तीच्या अस्तित्वाला पंख देण्यासाठी अशा विविध स्पर्धांचे आयोजन नेहमीच दिशा व्यासपीठामार्फत केले जाईल असे उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनी सांगितले. आयोजक निलम आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा उत्तमरित्या पार पडली. यामध्ये टायटल विनर ः कल्याणी ठाकरे -बेस्ट कॉश्युम, वैशाली मोरे – बेस्ट एम, मंजुषा दिलीप कदम-बेस्ट वॉक, रेश्मा शिनारे- बेस्ट आय, आलका चौधरी- बेस्ट स्कीन, माया फापाळे – बेस्ट बिहेव्हिअर, कावेरी थोरात – बेस्ट पर्सानलिटी, स्नेहल चेलेकर-फोटो जेनिक, निवेदिता बारापात्रे -बेस्ट कॉन्फीडंन्स, मनिषा शिंदे-बेस्ट स्माईल यांचा समावेश आहे.

Exit mobile version