दिशा महिला मंचाचा उपक्रम
| पनवेल । वार्ताहर ।
दिशा महिला मंच आयोजित हळदीकुंकूचा थाट खास तीच्यासाठी या उपक्रमाचे आयोजन कामोठे येथील आगरी हॉल या ठिकाणी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमीप्रमाणेच हळदी कुंकूची सुरुवात विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान देऊन करण्यात आली. पूर्वापार चालत आलेल्या त्या रुढीला बाजूला सारून सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिलाही समाजात तोच मानसन्मान मिळावा हीच भावना ठेऊन हळदी कुंकू चे आयोजन करण्यात आले होते.
कामोठे आरोग्य विभागातील मेडिकल स्टाफ व आशा सेविका व सफाई कर्मचारी यांचाही या समारंभात सहभाग होता आरोग्यकेंद्रात महिलांसाठी असणार्या सुविधाची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली. यावेळी 30 वैध्यत्व प्राप्त झालेल्या महिलांची ओटी भरून सन्मानित करण्यात आले. आपला जीवनपट सांगताना त्या गहिवरुन गेल्या समाजात कणखरपणे उभं राहणं किती गरजेचे आहे हें सांगताना असावांचा बांधही फुटला होता. अशा महिलांसाठी वेळोवेळी गरज असेल तेथे दिशा व्यासपीठ नेहमी त्यांच्याबरोबर असेल, असे आश्वासन यावेळी व्यासपीठाच्या संस्थापिका निलम आंधळे यांनी दिले.