माणगावमध्ये मंगळागौर स्पर्धेत निजामपूरचा स्वामीनी ग्रुप प्रथम

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुका व शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निजामपुर मार्गावरुन कुणबी भवन सभागृहात याठिकाणी घेण्यात आलेल्या मंगळागौरी स्पर्धेला तालुक्यातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत स्वामिनी ग्रुप निजामपूर या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी आ. अदिती तटकरे यांच्या हस्ते त्यांना रोख रुपये 7 हजार व आकर्षक प्रमाणपत्र देण्यात आले.

स्पर्धेतील उपविजेते हिरकणी ग्रुप कोशिंबळे संघास रोख रुपये 5 हजार व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे विजेते सखी ग्रुप साईनगर माणगाव संघास रोख रुपये 3 हजार व आकर्षक चषक तर उमेद ग्रुप सणसवाडी व लक्ष्मी ग्रुप आदिवासीवाडी माणगाव यांना उत्तेजनार्थ म्हणून रोख स्वरूपाची बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी संघ जिज्ञासा ग्रुप तिलोरे व शिरवली ग्रुप महिला मंडळ संघास रोख बक्षिसे देण्यात आली. शिवाय प्रेक्षकांमधील महिलांसाठी 10 लकी ड्रॉ ठेवण्यात आले होते.

या मंगळागौरी स्पर्धेचा तालुक्यातील महिलांनी मनमुराद आनंद लुटला. मंगळागौरी स्पर्धा यशस्वीरीत्या उत्साहात पार पाडण्यासाठी संगीता बक्कम, योगिता चव्हाण, अलका केकाणे, रिया उभारे, ममता थोरे, हर्षदा काळे, रश्मी मुंढे, सुविधा खैरे, सुशीला वाढवळ, लक्ष्मी हिलम, शुभांगी जाधव, माधुरी मोरे, देविका पाबेकर, नीलम निगडे,विशाखा यादव, किशोरी हिरवे, मनाली पवार,तुळसा पवार,सुरव सरपंच अल्पा जाधव,शिरवली सरपंच नेहा शिंदे,दीक्षिता जाधव,शीतल बेंदुगडे,भानुमती शेट,ज्योती खरंगटे,कृतिका गायकवाड यांच्यासह सहकारी सर्व महिलांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अपूर्वा जंगम यांनी केले.

Exit mobile version