| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिकेच्या मालमत्ता कर विभागात राबविण्यात येणाऱ्या आधुनिक व डिजिटल कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी) येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने नुकतीच पनवेल महानगरपालिकेस भेट दिली. या अभ्यास भेटीदरम्यान दोन्ही महानगरपालिकांमध्ये प्रशासकीय अनुभव व कार्यप्रणालीची देवाणघेवाण करण्यात आली.
यावेळी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त स्वरूप खारगे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मालमत्ता कर विभागातील विविध प्रक्रिया, कर आकारणी पद्धती, सर्वेक्षण, पुनर्मूल्यांकन तसेच डिजिटल उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात सुरू असलेल्या सुधारित कार्यप्रणालीचे सादरीकरणही करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका पथकात सहाय्यक आयुक्त अलका महापूरकर, वरिष्ठ लिपिक व कर निरीक्षक राकेश आंबेकर, अभिजीत वसावे, तसेच मेसर्स प्रोबेटीचे ओम महाजन आणि मेसर्स फॉक्सबेरीचे राहुल नाईक यांचा समावेश होता.
या भेटीदरम्यान मालमत्ता कर आकारणी व अंमलबजावणी प्रक्रिया, महसूल वाढीसाठी राबविण्यात आलेले उपक्रम, लेटिंग रेट व अन्युअल लेटिंग व्हॅल्यू निश्चिती, थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम, जीआयएस आधारित सर्वेक्षण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर तसेच नागरिक जनजागृती मोहिमा या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मे स्थापत्य कन्सल्टन्सीचे सत्यम आणि श्रीतेज म्हात्रे यांनी तांत्रिक बाबींविषयी माहिती दिली. या अभ्यास भेटीमुळे भविष्यातील कामकाज अधिक परिणामकारक, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
मालमत्ता कर विभागाच्या कार्यपद्धतीची एनएमएमसीकडून दखल

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606