शिंदेंसह 16 बंडखोर आमदारांना नोटीस

| मुंबई | प्रतिनिधी |
बंडखोरी करणार्‍या शिवसेनेच्या 16 आमदारांना राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नोटीस पाठवून येत्या 48 तासात उपस्थित राहून बाजू मांडण्याचे निर्देश दिलेले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे, चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे या आमदारांचा समावेश आहे.

स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, सेनेच्या बापाच्या नावे मागू नका, आधी नाथ होते आता दास झाले.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री


Exit mobile version