प्रवाशांना सूचना! दरड कोसळल्याने ‘हा’ मार्ग बंद

| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी येथे मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी याची नोंद घेणे गरजेचे आहे.

निवळी येथे दरड कोसळण्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. ही दरड हटवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, दरड कोसळल्याने हा मार्ग तूर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, गुहागर तालुक्यात गुहागर पाचेरी अगार या मुख्यमंत्री सडक योजनेच्या मार्गावर मोठी दरड कोसळल्याने हाही मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

गुहागर भातगाव मार्गे रत्नागिरीला जोडणारा हा एक पर्यायी महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, या मार्गावर दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे अशी माहिती गुहागर तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version