सावली रोडला मोठी दरड पडल्याने भालगाव मार्गही बंद
I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
अलिबाग-मुरुड मार्गावरील काशीद पुल कोसळल्यानंतर मार्ग बंद झाला आहे. तर सूपेगाव मार्गावरील नदीचे पाणी रस्त्यावर उतरल्याने हाही मार्ग बंद झाला. त्याचवेळी केळघर मार्गावर देखील दरड कोसळून तिसरा मार्ग देखील बंद झाल्यानंतर मुरुडकडे जाण्यासाठी एकमेव सुरू असलेल्या रोहा भालगाव मार्गावरील सावली रोडला मोठी दरड पडल्याने भालगाव मार्ग देखील आता वाहतुकीस बंद झाला आहे.