• Login
Monday, May 19, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

आता पंजाबला गँगवारची कीड

Varsha Mehata by Varsha Mehata
June 30, 2022
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
0
SHARES
94
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रा. नंदकुमार गोरे

काही वर्षांपूर्वी पंजाबमधल्या स्थितीवर आधारित ‘उडता पंजाब’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यावरून बराच वादंगही झाला होता. या चित्रपटामुळे पंजाबची बदनामी होत असल्याची टीकाही होत होती. आता सत्तांतर झालं असलं तरी पंजाबमधली गुन्हेगारी कमी झालेली नाही. उलट, प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर पंजाब ढवळून निघाला आहे. नेमकं काय घडत आहे या वलयांकीत राज्यामध्ये?

पंजाब म्हटलं की सर्वत्र वाहणारे कालवे, हिरवीगार रानं, कष्टकरी समाज, देशभर पसरलेला शीख समाज आणि समृद्ध खाद्य संस्कृती नजरेसमोर येते. देशाच्या सीमेवरचं हे राज्य अतिशय संवेदनशील म्हणून ओळखलं जातं. नव्वदच्या दशकात या राज्यात खलिस्तानवाद्यांनी डोकं वर काढलं होतं. अजूनही खलिस्तानवादी अधूनमधून असा प्रयत्न करतच असतात. गव्हाचं कोठार असणार्‍या पंजाबला आता गुन्हेगारीचा विळखा बसला आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिथला रोजगार कमी झाला आहे. तरुण व्यसनांच्या आहारी जात आहे. एकीकडे सीमेपलीकडच्या अतिरेक्यांचं आव्हान असताना दुसरीकडे राज्याला ड्रग्जची कीड लागली होती. गेल्या काही वर्षांमध्ये पंजाबला ‘गँगवॉर’ नामक नवा आजार जडला असून खलिस्तानी चळवळींमधून खतपाणी घातलं जात आहे . या गँगवॉरनं अनेक बळी घेतले. त्यात नव्यानं एक नाव जोडलं गेलं पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांचं. मुसेवाला यांची भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येसाठी रशियन बनावटीची अत्याधुनिक रायफल वापरण्यात आली. गँगस्टर्सच्या हाती अशा प्रकारच्या रायफल्स लागणं ही आणखी एका नव्या संकटाची सुरुवात आहे. त्यामुळे आता कुठे आणि कधी गोळीबार किंवा बॉम्बस्फोट होईल हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. हे गँगवार तरुणाईला उद्ध्वस्त करायच्या मार्गावर आहे. याच गँगवारमधून मुसेवालांची हत्या  झाल्याचं प्राथमिक तपासात दिसून येत असलं तरी त्याला काही राजकीय पार्श्‍वभूमी असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्याचं कारण म्हणजे आमदार झालो तर आपल्याला सुरक्षा व्यवस्था मिळेल, असं मुसेवाला यांनीच म्हटलं होतं.
पंजाबमध्ये सत्तांतर झालं आणि आम आदमी पक्षाची सत्ता आली. त्यानंतर तरी पंजाबमधलं वातावरण बदलेल असं वाटलं होतं; परंतु तसं झालं नाही. ‘आप’ची सत्ता आल्यानंतर त्यांनी जनहिताच्या अनेक घोषणा केल्या. ‘आप’ने भाजप आणि काँग्रेसची  वाट लावली. त्यामुळे आता भाजपने  जणू ‘आप’ ची कोंडी करायचं ठरवलं आहे. पण शह-काटशहाच्या राजकारणात पंजाबमधले मूलभूत प्रश्‍न मागे पडले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुसेवालांबाबतच्या घोषणांमधून राजकारण स्पष्ट दिसतं. पंजाबमधली पोटनिवडणूक आणि पुढील लोकसभेच्या निवडणुकीची व्यूहरचना या दृष्टीने मुसेवाला यांच्या हत्याकांडाचा उपयोग केला जात आहे. आरोपींची नावं आणि छायाचित्रं मिळाली असतानाही या हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचं सूतोवाच का केलं जात आहे, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो.
मुसेवाला हे प्रसिद्ध पंजाबी गायक होते. तरुण आणि सळसळतं रक्त.. त्यांचे लाखो चाहते… अशा व्यक्तीची पंजाबमधल्या बिश्‍नोई गँगसोबत दुश्मनी कशी, असा प्रश्‍न वाचकांना पडला असेल. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अकाली दलाचे युवा नेते विक्रमजीतसिंह मिड्डुखेडा यांची हत्या झाली होती. या हत्येशी मुसेवाला यांचा संबंध असल्याचा दावा बिश्‍नोई गँगने केला. मुसेवाला यांच्या हत्येनंतर बिश्‍नोई गँगने ‘सोशल मीडिया’वर तशा पोस्ट टाकल्या होत्या. मुसेवाला यांना बिश्‍नोई गँगकडून धमक्याही मिळत होत्या. आता त्यांच्या हत्येनंतर किमान सहा टोळ्या समोर आल्या आहेत. भूप्पी राणा या गँगने मुसेवाला यांच्या हत्येचा बदला घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. बिश्‍नोईविरुद्ध नीरज बवाना गँगही  उभी राहिली आहे. बवाना गँगचे संबंध दुबईपर्यंत असल्याचं बोललं जातं तर कोणताही संबंध नसणारी बंबीहा गँगही या वादात उतरली आहे. राणा आणि बिश्‍नोई हे एकमेकांचे कट्टर शत्रू. सदर हत्येप्रकरणी संपत नेहरा या गँगस्टरचीही चौकशी केली आहे. मूळचा नांदेडचा असणारा गँगस्टर हरविंदरसिंह रिंदाचीही दहशत सध्या चर्चेत आहे. तो पाकिस्तानमध्ये असून ‘आयएसआय’च्या इशार्‍यावर दहशतवादी कारवाया करत आहे. पंजाब त्याच्याही निशाण्यावर आहे. एकंदर मुसेवाला हत्याकांडानंतर तिहार तुरुंग पुन्हा चर्चेत आहे कारण याच ठिकाणी लॉरेन्स बिश्‍नोई कैदेत आहे. संपत नेहरादेखील तिथेच आहे. तिहारमधूनच बिश्‍नोई सगळी सूत्रं हलवत असल्याचा दावा केला जातो. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ज्याच्यामुळे अडचणीत आली, तो सुकेश चंद्रशेखर देखील तिहारमध्येच असून त्याने तिथूनच खंडणीखोरीची सूत्रं हलवल्याचा आरोप आहे. थोडक्यात सांगायचं तर, अमेरिकेतल्या ‘गन कल्चर’प्रमाणे पंजाबमध्येही ‘गन कल्चर’ वाढत असून नवोदित गायकांकडून त्याला खतपाणी घातलं जात असल्याची टीका सातत्याने होत आहे. मुसेवालादेखील त्याला अपवाद नव्हते. त्यांनी बंदुका आणि रायफल्ससोबतची अनेक छायाचित्रं ‘सोशल मीडिया’ वर पोस्ट केली होती.  प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहेंदी यांनी याकडे लक्ष वेधलं होतं. बिश्‍नोईने बॉलिवूड अभिनेता सलमान खानलादेखील धमकी दिली होती. सध्या ही बाबही चर्चेत आहे. ‘रेडी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने सलमानवर हल्ल्याचा कट रचला होता. त्यानंतर 2020 मध्ये त्याचा साथीदार नरेश शेट्टी यानेही सलमान खानच्या घराची रेकी केली होती. पण त्यांचा हेतू साध्य झाला नाही. बिश्‍नोई गँगचं मुख्य काम खंडणीखोरीचं आहे. हे लोक अनेक व्यावसायिकांकडून खंडणी उकळतात, दहशत पसरवतात.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी सीबीआय किंवा एनआयए तपास होऊ शकतो. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्य सरकारचा विषय असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे. पंजाब सरकारने शिफारस केल्यास केंद्र सरकार सीबीआय चौकशीसाठी तयार आहे. मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह आणि आई चरण कौर (सरपंच) यांनी शहा यांची भेट घेतली होती. भाजप नेते मनजिंदर सिरसा यांनीही मुसा गावात कुटुंबाची भेट घेतली. ते म्हणाले की, एनआयए किंवा सीबीआय तपासासाठी पंजाब सरकारची सहमती आवश्यक आहे. याबाबत शहा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी चर्चा करणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याआधीच, कुटुंब म्हणेल ते करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. अशा स्थितीत पंजाब पोलिसांनी प्रकरणाचा छडा लवकर लावला नाही तर राज्य सरकारला शिफारस करता येईल.
 कॅनडामध्ये बसलेल्या लॉरेन्स गँगचा गँगस्टर गोल्डी ब्रार याने मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी घेतली असली तरी पोलिसांनी अद्याप संपूर्ण कटाचा उलगडा केलेला नाही. विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी पूर्ण झाली नाही. उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत या हत्येची चौकशी करण्याची मागणी मुसेवाला यांच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यांनी शवविच्छेदनासाठी संमती दिली नाही.
त्यानंतर पंजाब सरकारने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना या हत्त्येचा निवाडा करण्यासंदर्भात पत्रही लिहिलं; मात्र उच्च न्यायालयाने न्यायाधीशांची कमतरता आणि प्रलंबित प्रकरणं दाखवून त्याला नकार दिला. पंजाब पोलिसांनी एसआयटी बदलली तरी निकाल लागला नाही. थोडक्यात, मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब सरकार चांगलंच बुचकळ्यात पडलं आहे. आता तपास अँटी गँगस्टर टास्क फोर्सकडे (एजीटीएफ) सोपवण्यात आला आहे. एडीजीपी प्रमोद बन हे सदर प्रकरणावर देखरेख करतील. यामध्ये पीएपीचे आयजी जसकरण सिंग आणि एजीटीएफचे एआयजी गुरमीत चौहान यांच्याशिवाय एकूण पाच सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
सिद्धू मुसेवाला यांच्या कथित मारेकर्‍यांचं पहिलं चित्र समोर आलं असून सदर फोटोमध्ये दोन लोक दिसतात. ही छायाचित्रं मुसेवाला यांच्या हत्येपूर्वीची आहेत. या फोटोंशिवाय मुसेवालावर हल्ला करणार्‍या हल्लेखोरांचा हल्ल्यानंतरचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. हल्लेखोरांनी बाप्पी आना गावाजवळ एका कारस्वाराला थांबवून कार हिसकावून पळ काढल्याचं त्यात दिसत आहे. या हल्ल्याशी संबंधित काही गाड्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत.
थोडक्यात, या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना गुंतागुंतही वाढत आहे. या कटासंबंधीची माहिती लवकरात लवकर उघड व्हावी, अशी पोलिसांची इच्छा आहे तर दुसरीकडे खुनाचा आरोपी लॉरेन्स बिश्‍नोई पोलिसांसमोर वारंवार आपलं म्हणणं बदलत आहे. त्याचबरोबर नेपाळशीही या हत्येचं कनेक्शन जोडलं जात असून दिल्ली पोलिस नेपाळमध्येही पोहोचले आहेत. या सगळ्यातून लवकरच सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे. मात्र तोपर्यंत अनेक गँगस्टर्सची आणि त्यांच्या टोळ्यांची जोरदार चर्चा सुरु असल्याने पंजाब नव्या वादाच्या केंद्रस्थानी आहे.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

एका सरकारचा अंत

Next Post

एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
भारताचे मिशन ‘मेडल्स’
sliderhome

भारताचे मिशन ‘मेडल्स’

July 22, 2024
Next Post

एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?