आता औषधंही महागली

दोन दशकांत औषधांच्या किमतीत विक्रमी वाढ
। मुंबई । वृत्तसंस्था ।
इंधन दरवाढीचा फटका सामान्यांच्या खिशाला बसला आहे. त्यातच आता रुग्णांनादेखील याची झळ लागणार आहे. इंधन दरवाढीनंतर औषधांच्या दरातही वाढ झाली आहे. यामध्ये 15 ते 40 टक्क्यांनी औषधांच्या किमती वाढल्या आहेत.
हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब अशा काही आजारांच्या औषधांच्या किमती 15 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर, दुसरीकडे टॉनिक, एन्टिबायोटिक्स औषधांबरोबरच खोकल्याची औषधंही महागली आहेत. त्यामुळे आता अत्यावश्यक औषधं सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर बाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोरोना संकटामुळे औषधं बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि रसायनांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. या गोष्टींच्या किमतीही दरम्यानच्या काळात 50 टक्क्यांनी वाढल्याने औषधं महागली आहे. गेल्या दोन दशकातली औषधांच्या किमतीतली ही विक्रमी वाढ असल्याचं औषध विक्रेत्यांचं म्हणणं आहे.

औषधांच्या किमती, औषध आधी आता
बीपीची गोळी एक स्ट्रिप 172 रुपये 190 रुपये
डायबेटीज गोळी एक स्ट्रीप 11 रुपये 30 पैसे 18 रुपये 50 पैसे
अँटासिड 15 गोळ्या 24 रुपये 37 रुपये
डेटॅाल बाटली 105 रुपये 116 रुपये
कॅल्शियम गोळ्या 99 रुपये 110 रुपये
खोकल्याची बाटलीची सहा महिन्यांत 40 ते 50 रुपयांनी वाढ

Exit mobile version