आता वीज पुरवठा होणार अंडरग्राउंड

। चिपळूण । प्रतिनिधी ।
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील वीजपुरवठा अंडरग्राउंड केबलच्या माध्यमातून करण्यात येणार असून मार्च 2022 पूर्वी हे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कोकण विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी माध्यमांसह बोलताना दिली. लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशने औद्योगिक वसाहतीमधील वीज पुरवठ्याच्या प्रश्‍नासंदर्भात विज बिल न भरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर सप्टेंबर 2021 पासून काम करण्याचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे कामाला सुरुवात करण्यात आली.

Exit mobile version