| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली. दरम्यान, सामना झाल्यानंतर कर्णधार केएल राहुल पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हणाला की, सध्या खूप क्रिकेट खेळलं जात आहे. त्यामुळे तुम्हाला एका प्रकाराला प्राधान्य द्यावं लागतं. सध्याच्या घडीला एकदिवसीय नाही, तर टी-20 आणि कसोटी या दोन खेळांना जास्त प्रधान्य आहे. संघातील सर्व खेळाडू देशासाठी चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खळण्याची चांगली संधी मिळाली आहे.
दरम्यान, भारताच्या मालिकेतील पहिल्या विजयाबद्दल राहुल म्हणाला की, ‘विजय मिळवल्याने मी खूष आहे. आम्ही ज्या प्रकारची अपेक्षा केली होती, त्यापेक्षा वेगळंच घडलं. आमची योजना फिरकीपटूंवर अवलंबून होता. मात्र, वेगवान गोलंदाजांनी खरोखरच चांगली कामगिरी केली. त्यांनी अत्यंत शिस्तीत मारा केला.