आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांची पनवेल केंद्रास भेट

। उरण । वार्ताहर ।
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक दिग्मार वॉल्टर यांनी नुकतीच पनवेल येथील कामगार केंद्रास भेट देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलचे सरचिटणीस संजय वढावकर, श्रुती शाम म्हात्रे यांच्यावतीने ठाणे व पनवेल येथील दोन्ही केंद्रात कामकाज चालू आहे. पनवेल मधील खांदा कॉलनी येथील आगरी शिक्षण संस्थेत कामकाज सुरू आहे.

यावेळी संजय वढावकर यांनी थोडक्यात कार्यक्रमांचा सारांश व आ.एल.ओ. मार्फत चालू असलेल्या कामाचा माहिती व आढावा पाहुण्यांना करून दिला. रायगडचे कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांनी देखील दिग्मार वॉल्टर यांच्याशी संवाद करून कामगारांच्या व खङज च्या कामाची माहिती दिली. खांदा कॉलनीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी देखील दिग्मार वॉल्टर हयांच्याशी कामगारांच्या प्रश्‍नाबाबत चर्चा केली.कार्यक्रमांचा शेवट श्रुती शाम म्हात्रे सदस्या हिंद मजदूर सभा यांनी पी.पी.टी. व्दारे आजपर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती सादर केली.

कार्यालयीन प्रमुख एकनाथ ठोंबर व नयना आंबवणे तसेच बेबी शेख यांचे कौतुक केले. दिग्मार वॉल्टर यांच्या हस्ते आगरी शाळेतील विदयार्थ्याना चॉकलेटचे वाटप व शाळेच्या मैदानामध्ये वृक्षारोपण करून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास पनवेल तहसिलदार विजय तळेकर , शामकांत जोशी आदी उपस्थित होते.

Exit mobile version