| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
वीरशैव लिंगायत समाज मित्र मंडळ मालगुंड यांच्या वतीने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई या जिल्ह्यातील लिंगायत समाजाच्या भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन 10 व 11 रोजी मालगुंड येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत कोकणातील लिंगायत समाजातील 16 संघांना निमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम लढत ओम नागेश्वर गोमाशी रायगड विरुद्ध शिवमुद्रा ओनी रत्नागिरी या दोन संघात झाली.
गोमाशी रायगड संघातील खेळाडूने विरेंद्र जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली आपला बहारदार खेळ करत या स्पर्धेतील अंतिम विजयाची मोहर उमटवली. या संघास रोख रक्कम 15 हजार रु व आकर्षक चषक, तर उपविजेता पदाचा मानकरी शिवमुद्रा ओनी रत्नागिरी या संघास रोख रक्कम 11 हजार रु व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक सेव्हन स्टार गुहागर या संघास रोख रक्कम पाच हजार व आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांक रत्नागिरी या संघास रोख रक्कम तीन हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रतीक जंगम, उत्कृष्ट चढाई प्रतीक आणि उत्कृष्ट पक्कड मनोज जंगम यांस आकर्षक चषक देऊन मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
लिंगायत समाजाच्या भव्य कबड्डी स्पर्धेत ओम नागेश्वर गोमाशी विजयी
